ए सखी तुझी निरागसता झाडांशी बोलण्यात आहे , त्यांना हळूच घट्ट मिठी मारण्यात आहे,
निरागसता फुलांशी बोलण्यामध्ये आहे,
निरागसता नुसतेच एकमेकां कडे बघून हसण्यामध्ये आहे,
निरागसता पावसामध्ये भिजण्यामध्ये आहे,
निरागसता चालता चालता येणाऱ्या डबक्या मध्ये हळूच उडी मारण्यामध्ये आहे,
निरागसता प्राण्यांशी बोलण्यामध्ये आहे,
निरागसता लहान होऊन लहानांन मध्ये खेळण्यात आहे,
निरागसता खळखळून छोट्या गोष्टीवर हसण्यामध्ये आहे,
निरागसता त्या साबणाच्या पाण्याचे फुगे करण्यामध्ये आहे,
निरागसता बाथरूम च्या शॉवर मध्ये खेळण्यांमध्ये आहे,
निरागसता वयाचे भान सोडून लॉलीपॉप खाण्यामध्ये आहे,
निरागसता आपल्याला कोणी नाही बघत आहे ना हे बघून घसरगुंडी वर हळूच घसरून येण्यामध्ये आहे,
निरागसता आईच्या कुशीत शिरून झोपी जाण्यामध्ये आहे,
ए सखी हि निरागसता जपून ठेव, जी अगदी लुप्त झाली आहे.
No comments:
Post a Comment