Tuesday, 20 June 2023

जागतिक पर्यावरण दिन

५ जून ला जागतिक पर्यावरण दिवस.  मुळात जागतिक पर्यावरण दिन साजरा करावा लागत आहे हीच बाब खूप खंत करण्यासारखी आहे. अनादी काळापासून हा दिवस कधी साजरा केला होता का आपल्या पूर्वजांनी,असे कधी ऐकीवात आहे का ?

माणसाने आपल्याच सोयी साठी केलेल्या चुकांमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी केली आहे. ईश्वर निर्मित या पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांने  १९७३ साली पहिल्यांदा जागतीक पर्यावरण दिन आयोजित करून सागरी प्रदूषण, जास्त लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग, शाश्वत उपभोग आणि वन्यजीव गुन्हेगारी यांसारख्या पर्यावरणीय समस्यांवर जागरूकता निर्माण करून एक मोठे  व्यासपीठ तयार केले. रेक्स एन. ओलिनारेस याना पर्यावरण विज्ञानाचे जनक जाणले जाते त्यांनी सुष्मजीवांचा प्रादुर्भाव थांबण्यासाठी निसर्ग स्वच्छ आवश्यक आहे असे अभ्यासपूर्वक सांगितले आहे. 


प्रत्येक मनुष्य जिवाने स्वतःहून निश्चय केला पाहिजे कि आपण हा दिवस फक्त ५ जूनलाच फक्त साजरी न करता प्रत्येक दिवस पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. आताच्या इंटरनेट सोशल मीडिया वातावरणामुळे खूप छान जागृती झाली आहे. नवनवीन प्लास्टिक ला पर्यायी उत्पादने निर्माण होत आहे, तसेच बरेच शाळांमधून इतर संस्था ग्रुप मधून  झाडे लावा झाडे जगवा मोहीम राबवली जात आहे. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिना निमित्त नवनवीन थीम राबवली जात आहे ज्यात प्रमुख कार्पोरेशन आणि समुदाय पर्यावरणाविषयी कारणांची तपासणी करत आहेत


ईश्वर निर्मित पृथ्वी ही मातेसमान आहे आणि तिच्या पर्यावरणाची काळजी आपणच घेतली पाहिजे.

जागतिक पर्यावरण दिनाचा नारा : “हमारा ग्रह, हमारी जिम्मेदारी! एक पेड़ लगाओ, एक जीवन बचाओ! पुनर्चक्रण - भविष्य अब है! पुन: उपयोग रीसायकल कम!”


No comments:

Post a Comment

जागतिक पर्यावरण दिन

५ जून ला जागतिक पर्यावरण दिवस.  मुळात जागतिक पर्यावरण दिन साजरा करावा लागत आहे हीच बाब खूप खंत करण्यासारखी आहे. अनादी काळापासून हा दिवस कधी ...